Testimonial

श्री विकास नागनाथ मुळे

समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे

मी १९९६ साली ९वी असताना बीजेएसमध्ये दाखल झालो. त्या वेळी माझा भाऊ ज्ञानोबा बीजेएसमधून १०वीत प्रथम आला होता. जो एक कवी, नाटककार होता. बीजेएसमध्ये राहून मी माझं डी एड पर्यंतचे शिक्षण २००३ मध्ये पूर्ण केले.

सध्या मी नाशिक जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून १३ वर्ष काम करीत आहे. श्री. शांतिलाल मुथ्था यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. २०१६ मध्ये माझ्या गावात वृक्ष लागवड मोहीम राबवून जवळपास ५०० झाडे लावली पण पावसाअभावी या कामात यश आले नाही. मात्र शिवजयंतीच्या माध्यमातून जागृतीचे काम करीत आहे.