Testimonial

भिमसेन वसंतबुवा भारती

१९९३ साली मी ७वीत असताना भारतीय जैन संघटनेच्या शाळेत दाखल झालो. पदवी पर्यंतचे शिक्षण वाघोली येथील संकुलात पूर्ण केले. शेवाटच्या वर्षाला असताना १४ फेब्रुवारी २००४ला उस्मानाबादला पोलीस दलात भरती झालो. सध्या मी उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत आहे.

भारतीय जैन संघटनेत असताना वेळोवेळी गुरुजनांचे चांगले मार्गदर्शन लाभले. गुरुजनांमुळेच मी या पदापर्यंत पोचलो. श्री. शांतिलाल मुथ्था यांच्या सामाजिक कार्याला सलाम. भारतीय जैन संघटनेच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.